@maharashtracity

भाजप आमदार राम सातपुते यांचा घणाघाती आरोप

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) जे काम करत आहेत, त्याला प्राईड व्हॅल्यू आहे. पण संजय राऊत (Sanjay Raut) यांना ते कसे कळणार? राऊत यांची मोदी यांना समजण्याची कुवत नाही, अशा शब्दात भाजप आमदार राम सातपुते (BJP MLA Ram Satpute) यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर कडवट भाषेत टीका केली आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली बांधले जात असलेल्या सेंट्रल विस्टा (Central Vista project) व अन्य प्रकल्पावर संजय राऊत यांनी टीका केली होती.

त्याला प्रत्युत्तर देतांना राम सातपुते म्हणाले, “जनाब संजय राऊत, तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं. कारण आपल्या सारखा ‘खुशामतगिर’ परत होणे नाही. कदाचित त्यामुळे आपल्याला ‘प्राईड व्ह्युल्यु ‘काय असते? हे समजण्याची तुमची कुवत नाही.”

सातपुते पुढे म्हणाले, “त्यामुळेच पंतप्रधान मोदी बांधत असलेलं सेंट्रल व्हीस्टा हे नवे संसद भवन असो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा (Statue of Subhash Chandra Bose) असो की काशीचं भव्य दिव्य मंदीर असो. हे सर्व तुमचा जळफळाट करणारच आहे.”

संजय राज्य यांनी महाराष्ट्रातील समस्यांबद्दलही लिहावे असा सल्ला भाजप आमदार यांनी दिला.

वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा (backward class students) टक्का उच्चशिक्षण व संशोधनात वाढावा या साठी बार्टीसारख्या (BARTI) संस्थेची स्थापना करण्यात आली होती, याची आठवण करून देतांना सातपुते म्हणाले, परंतु, या आघाडी सरकारच्या (MVA Government) कामचुकार धोरणामुळे तिचा उद्देशच नष्ट होतोय. यामुळे ५१८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती होऊन वर्ष उलटून गेलं तरी त्यांना शिष्यवृत्ती (scholorship) मिळालेल्या नाहीत.

यावर राऊत कधी बोलणार की, वंचीत नेहमी वंचीतच राहिले पाहिजे, हे काँग्रेसचच (congress) धोरण आपण राबवणार आहात, असा सवाल राम सातपुते यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here