@maharashtracity

प्रतिनिधी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी सोमवारी ट्विट करत ते कोविड-१९ (covid-19) पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. यात चिंतेची बाब नसून त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांनी सुचनेप्रमाणे उपचार सुरु असल्याचेही पवार यानी ट्विटमध्ये स्पष्ट केले.

दरम्यांन शरद पवार यानी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस (vaccination) घेतले असल्याची माहिती देण्यात आली.
शरद पवार यांची कोविड टेस्ट करण्यात आल्यावर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, काळजी करण्याचे कारण नसून डॉक्टरांच्या सुचनांप्रमाणे काळजी घेण्यात येत आहे आणि उपचार सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपर्कात आलेल्याना स्वतःची चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी ट्विटमध्य केले आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवार यांना लवकरात लवकर बरे हिण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here