@maharashtracity

महिला व बालकल्याण सभापतीपदी बागुल

उपसभापतीपदी पवारही बिनविरोध

धुळे: धुळे महानगर पालिकेच्या (Dhule Municipal Corporation) स्थायी समिती सभापाती पदावर भाजपचे शितलकुमार नवले यांची तर महिला व बालकल्याण सभापतीपदी योगिता बागुल, उपसभापतीपदी आरती पवार यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडीनंतर भाजपा (BJP) कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शितलकुमार नवलेंसह बागुल, पवार यांचा पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सत्कार केला.

दरम्यान, शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी माझे प्रयत्न असतील, असे आश्‍वासन सभापती शितलकुमार नवले यांनी यावेळी दिले.

धुळे महानगरपालिकेच्या (DMC) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात मंगळवारी ऑनलाईन विशेष सभा झाली. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ यांच्या उपस्थितीत या तिन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया राबविली गेली.

तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल असल्याने निवडीची ही सभा केवळ औपचारिकता ठरली. भाजपतर्फे सभापती पदासाठी नगरसेवक शितल नवले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली. महिला व बाल कल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठीही योगिता बागुल व आरती पवार यांचाही एकमेव अर्ज असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली.

या निवडीनंतर सभापती शितलकुमार नवले, महिला व बालकल्याण सभापती योगिता बागुल, उपसभापती आरती पवार यांचा खा. डॉ.सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी महापौर मोहन नवले, चंद्रकांत सोनार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविकांनी सत्कार केला. निवड प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या आवारात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here