पक्षाकडून पक्षादेश जारी
@maharashtracity
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड ते विधान सभागृहात विविध विधेयके संमत करून घेण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेना पक्षाने आपल्या विधिमंडळातील सर्व सदस्यांना सभागृहातील उपस्थिती अनिवार्य करण्यासाठी पक्षादेश जारी केला आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) सन 2022 23 चा अर्थसंकल्प, शासकीय विधेयके, विविध ठराव, प्रस्ताव, त्यावर होणाऱ्या चर्चा व वेळप्रसंगी मतदान होऊन ते संमत करण्यात येणार आहे. तसेच 9 मार्च रोजी विधानसभा अध्यक्षांची (Speaker) निवड होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेने (Shiv Sena) खबरदारीचा उपाय म्हणून पक्षाच्या सर्व सदस्यांना सभागृहातील उपस्थिती अनिवार्य करण्यासाठी पक्षादेश (Whip) जारी केला आहे.
अधिवेशन काळात सर्व सदस्यांनी संपूर्ण दिवस सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत उपस्थिती अनिवार्य असणे गरजेचे असल्याचे, पक्षाने सर्व आमदारांना सूचित केले आहे.