@maharashtracity
ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती
मुंबई: अभिनेत्री आणि शिवसेना नेता उर्मिला मातोंडकर ( Shivsena Leader Urmila Matondkar) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याची माहिती मातोंडकर यांनी ट्विट करुन दिली. त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले असून संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी, असे ट्विट करून सांगितले आहे.
तुर्तास राज्यातील कोरोना संसर्ग कमी होत आहे. ShivSena leader Urmila Matondkar corona positive
लसीकरणाचा ( Vaccination) हा फायदा दिसून येत असताना कोरोनाचे रुग्ण देखील आढळून येत आहेत. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena chief Raj thackeray) यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात आले होते. हा संसर्ग सौम्य होता. ते कोरोना मुक्त झाले असल्याचेही सांगण्यात आले. अशा वेळी मातोंडकर यांनी व्टिट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह असली तरीही मी ठिक आहे. सध्या मी विलगीकरणात (Home Quarantine) असून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी ( Corona Test) करावी. तसेच दिवाळीच्या सणामध्ये (Diwali Festival) सर्वांनी काळजी घ्यावी, असे उर्मिला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.