@maharashtracity

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

मुंबई: गुजरात मधील ‘गिफ्ट’ (GIFT City) सिटीप्रमाणे मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलाचा (Bandra – Kurla Complex) विकास करावा आणि तशाच कर सवलती आणि इतर सुविधा इथेही लागू कराव्यात, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी लोकसभेत केली.

केंद्रीय अर्थसंल्पावरील चर्चेदरम्यान खासदार शेवाळे यांनी अर्थमंत्र्यांकडे ही मागणी केली. तसेच मुंबईत त्वरित इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (Indian Institute of Management – IIM) स्थापना करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session of Parliament) केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान खासदार राहुल शेवाळे यांनी आपले मत मांडले. खासदार शेवाळे म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी (Economic capital of India) आहे. तरीही अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणतीच ठोस तरतूद नाही. सर्वात जास्त कर देणाऱ्या मुंबईकरांची (Mumbaikar) निराशा अर्थसंकल्पातून झाली आहे.

आंतररष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (International Financial Services Center – IFSC) मुंबईत प्रस्तावित होते. मात्र, बुलेट ट्रेनच्या (bullet Train) प्रस्तावित स्थानकाच्या कामामुळे हे सेवा केंद्र उभारण्यात उशीर झाला. त्यामुळे हे केंद्र गुजरातला (Gujarat) उभारण्यात आले.

मात्र, आय एफ एस सी सेंटर हे मुंबईतच व्हायला हवे, अशी मागणी करून खासदार शेवाळे म्हणाले, गुजरातच्या गिफ्ट सिटी मध्ये कर सवलती (tax exemption) आणि ज्या इतर सुविधा उद्योगधंद्याना दिल्या जातात, त्याच सवलती मुंबईच्या बीकेसीमध्ये (BKC) दिल्या जाव्यात आणि गिफ्ट सिटी च्या पार्श्वभूमीवर इथेही अशीच सिटी उभारली जावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here