मुख्यमंत्री पदासह 18 पदे सेनेकडे तर आघाडीला प्रत्येकी 12 मंत्रीपदे?

मुंबई

भारतीय जनता पक्षाने (BJP) सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी 56 जागा जिकलेल्या दुसऱ्या क्रमाकवारील शिवसेनेला (Shiv Sena) सत्ता स्थापन करू शकेल का अशी विचारणा केली आहे. सेना नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात सुरू असलेली चर्चा निर्णायक वळणावर आहे. मध्यावधी निवडणूक झाल्यास खर्च करण्याची कोणाचीही तयारी नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Congress) हे पक्ष शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करतील, असा दावा सेनेतील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला.
या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचा मुख्यमंत्री (CM) होईल. तसेच नगर विकास (UD), महसूल (Revenue) आणि सार्वजनिक बांधकाम (PWD) ही महत्वाची खातीही सेनेकडे राहील. सेनेला एकूण 18 मंत्रीपदे मिळतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसला प्रत्येकी 12 मंत्रीपदे देण्यात येतील.


अर्थात हा सेनेने केलेला दावा असून काँग्रेस मध्ये सेनेला पाठींबा देण्याच्या मुद्यावरून दोन गट पडले आहेत. सेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) हे सोमवारी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. या बैठकीतून काय निष्पन्न निघेल यावर सेना आणि आघाडीच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असेल.


दुसरीकडे राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेते हीच संधी आहे असा दावा करून सेनेसोबत जाण्यास तयार आहेत.मात्र, शरद पवार यांनी अजूनही त्यांचे डावपेच जाहीर केलेले नाहीत.


सेना नेत्याचा दावा खरा ठरल्यास येत्या 48 तासात सेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत (Arvind Sawant) राजीनामा देतील, सेना भाजच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही (NDA) आघाडीतून बाहेर पडतील. त्यानंतर राष्ट्रवादीला आणि कॉंग्रेवला सेनेकडून अधिकृत पत्र देऊन पाठींबा मगितला जाईल आणि मग पुढच्या काही दिवसात सेना आघाडीचे सरकार शपथ घेईल.
दरम्यान, भाजपने पक्ष नेत्यांची बैठक बोलावली असून पुडील रणनीती ठरविली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here