मुंबई, 1 सप्टेंबर : सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. पण त्याचवेळी उदयनराजे यांच्याबाबतच्या नव्या चर्चांनी राष्ट्रवादीसह भाजपचीही डोकेदुखी वाढली आहे. कारण उदयनराजे भोसले हे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

उदयनराजे भोसले यांची नुकतीच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासोबत महत्वाची बैठक झाली. त्यामुळे उदयनराजे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. वरुण सरदेसाई यांनी या भेटीचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे. मात्र तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक आणि पक्षबदलासाठी उदयनराजेंच्या सुरू असलेल्या हालचाली, यामुळे ते शिवसेनेच्याही संपर्कात आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

उदयनराजे आणि भाजप प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींनी वेग पकडला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसणार, हे आता जवळपास निश्चित आहे. कारण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here