भाजप आमदार नितेश राणे यांचा आरोप

@maharashtracity

मुंबई: मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी 107 हुतातम्यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी बारा वर्षांपूर्वी स्मृती दालन उभारण्यात आले. परंतु, आजपर्यंत हे दालन सामान्य नागरिकांसाठी खुलर करण्यात आले नाही. या दालनाला खाजगी प्रॉपर्टी समजणारे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या दलनावर अतिक्रमण केले असून त्यांना ते बळकायचे आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशुन जारी केलेल्या व्हिडिओद्वारे आमदार राणे म्हणाले, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत (Samyukt Maharashtra Movement) १०७ मराठी हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. या हुतात्म्यांच्या बलीदानाचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतोय. कारण या चळवळीच्या स्मृती स्मरणात राहव्यात यासाठी शिवाजी पार्क येथे स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी करण्यात आली. त्याला आता ३० एप्रील रोजी १२ वर्षे पुर्ण झाले. परंतु या कलादालनाकडे आपण हेतूपूरस्परपणे दुर्लक्ष करत आहात.

महाराष्ट्र दिन तोंडावर आलेला असताना हे कलादान अद्यापही पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. इथे कुठली रंगरंगोटी केली गेलेली नाही. एवढेच नाही तर कलादालनावर विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून सहा महिने उलटले तरी कलादालनावर विस्मरणाचा अंधार पडलेला आहे. उलटपक्षी या कलादालनाचा उपयोग अधिकाऱ्यांच्या गाड्या पार्किंगसाठी व मिटींगसाठी केला जातोय, याकडे राणे यांनी लक्ष वेधले.

स्व. बाळासाहेबांच्या हेतूला बाजूला सारत स्वत:च्याच फोटोग्राफीसाठी आपण यातील एक मजला अडवलेला आहे. आता संपूर्ण कलादालनच ठाकरे कुटुंबियांची प्रायव्हेट प्रॉपर्टी करण्याचा घाट तर आपण घालत नाहीयेत ना? अशी खदखद आता सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात आहे. सर्वच पातळ्यांवर आपण कलादालनाचा सर्वसामान्यांना विसर पडावा यासाठीची खबरदारी घेतली जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

राणे म्हणाले, पर्यटन खाते युवराजांकडे असतानाही कलादालनाचा समावेश महाराष्ट्र पर्यटन विकास कॉर्पोरेशनच्या सुचीत का गेला जात नाही? यावरून हेच स्पष्ट होते आहे की आपली या कलादालनाबाबत असणारी मनिषा काही वेगळीच आहे. आपण जो महाराष्ट्र्च्या आस्मितेचा उसना राग आळवता किमान त्याच्याशी तरी प्रामाणिक राहून १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादानवर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे, याचा पर्यटन सुचीत समावेश करावा आणि आपला हेतूवर उठलेलं शंकेच मोहोळ शांत करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here