@maharashtracity

मुंबई: मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लाटण्याचे काम ठाकरे सरकार (Thackeray Government) करत आहे. त्यासाठीच विद्यापीठ कायद्यात बदल करण्यास सुरुवात झाली आहे”, असा घणाघाती आरोप भाजप आमदार ऍड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना शेलार म्हणाले, यासंदर्भातील काही बातम्‍या आल्‍या आहेत. एसआरएसाठी (SRA) भूखंड देणे, काही नोंदणीकृत, नोंदणी नसलेल्‍या काही संस्‍थांना भूखंड देणे सुरू आहे. त्‍यामुळे आपल्‍या मर्जीतील कुलगुरू विद्यापीठात बसविले जात असून भूखंड लाटण्‍यासाठी केलेले हे बदल आहेत, असा गंभीर आरोपही यावेळी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.

भाजपच्या युवा मोर्चाकडून (BJP Youth Morcha – BJYM) विद्यापीठ बचाव हा कार्यक्रम घेण्यात येईल. मा. मंत्री महोदय तुम्ही घेतलेले सर्व निर्णय अधिकारांचे केंद्रीकरण करणारे आहेत, विद्यापीठांची गुणवत्‍ता कशी वाढेल याबाबत कधी चर्चा का केली नाही, असा सवालही त्‍यांनी केला.

हा विद्यापीठांवर (University) घाला असून महाराष्‍ट्रातील नागरीकांनी या विरोधात व्‍यक्‍त व्‍हायला हवे, असे आवाहनही आमदार अॅड आशिष शेलार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here