हे आमदार घेताहेत नगरसेवक पदाचे सुद्धा मानधन @maharashtracity

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी आमदार व खासदार झाल्यावर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे. परंतु, आमदार म्हणून निवडून आलेले पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे हे नगरसेवक पालिकेचेही मानध घेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali) यांना चिटणीस खात्याने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती की सद्यस्थितीत जे नगरसेवक, आमदार आणि खासदार झाले आहे त्यांची माहिती द्यावी. त्यांचे नाव, वेतन व भत्ता अशी एकूण रक्कम घेत असल्यास, नसल्यास त्याची माहिती देण्यात यावी.

चिटणीस खात्याने अनिल गलगली यांना कळविले की खासदार मनोज कोटक (MP Manoj Kotak) आणि आमदार रमेश कोरगावकर (MLA Ramesh Koregaonkar) मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख (MLA Raees Sheikh),  पराग शहा (Parag Shah) आणि दिलीप लांडे (Dilip Lande) यांस दरमहा रु. २५०००/-  मानधनासाठी  आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता रु. १५०/- भत्ता अशा केवळ चार सभांकरिता दिले जाते.

अनिल गलगली यांच्या मते राजकीय पक्षाने त्यांचे जे नगरसेवक हे आमदार किंवा खासदार म्हणून निवडून आले आहेत, त्यांच्याकडून नगरसेवक पदाचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण दुर्दैवाने कोठल्याही राजकीय पक्षाने असा निर्णय घेतला नाही. अशा परिस्थितीत या लोक प्रतिनिधीनी नगरसेवक म्हणून मानधन घेऊ नये, अशी सूचना करणे आवश्यक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here