uddhav

निवडणूक आयोगाच्या निकालाचे प्रकरण देशभर पेटेल

उद्धव ठाकरे यांचा इशारा

By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर घणाघाती टीका केली. पक्ष व निवडणूक चिन्हं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना देण्याच्या आयोगाच्या कृतीवर ठाकरे यांनी संताप व्यक्त करताना स्पष्ट केले की, केंद्रीय निवडणूक आयोगाला फक्त पक्षाचे नाव आणि निवडणुकीसाठीचे चिन्ह ठरविण्याचा अधिकार आहे. त्याव्यतिरिक्त निवडणूक आयोगाला इतर अधिकार नाहीत.

ठाकरे म्हणाले, देशात निवडणुका घेणे, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत आहे की नाही, हे बघण्याचा अधिकार त्यांना आहे. पण निवडणूक आयोग (Election Commission of India) म्हणजे सुलतान नाही. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांचा मला फोन आला होता. त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर नीतिशकुमारांचाही (Bihar CM Nitish Kumar) फोन आला होता. मात्र, चुकामूक झाल्यामुळे त्यांच्याशी माझे बोलणे होऊ शकलेले नाही. मला अनेकांचे फोन येत आहेत, त्यांच्याशी सल्लामसलत करत आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निकालाचे प्रकरण देशभर पेटेल. आज एका पक्षावर पाळी आणल्यावर उद्या बाकीचे पक्षही ते संपवतील की काय अशी भीती नागरिकांच्या मनात आहे. देशातील लोकशाही (Democracy) जिवंत ठेवायची असेल तर ती लोकशाही इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर फक्त ७५ वर्षेच शिल्लक राहिली होती काय, असा प्रश्न आपल्याला भावी काळ विचारेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here