By सदानंद खोपकर
@maharashtracity
मुंबई: मुंबई जिल्हा बँकेच्या (Mumbai Bank) प्रकरणात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (LoP Pravin Darekar) यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी आज विधान परिषदेत विरोधी पक्ष सदस्यांनी प्रश्नोत्तर तासात गदारोळ केला. सत्ताधारी सदस्यांनी प्रतिघोषणा देत प्रत्त्युत्तर दिले.
सभागृहातील गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.
प्रश्नोत्तरे पुकारताच भाजप सदस्य भाई गिरकर (BJP MLC Bhai Girkar) यांनी विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचा विषय छेडला. तेव्हा गदारोळ सुरू झाला. यावेळी सभापतींच्या आसनापुढे येऊन विरोधी पक्ष सदस्य घोषणा देत होते.
उपसभापती डॉ नीलम गोर्हे (Dr Neelam Gorhe) यांनी आधी सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब केले. मात्र, त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी दिवसभरासाठी कामकाज थांबवले.