vivek

@maharashtracity

पुण्यनगरीचे मंदार पारकर सचिव

मुंबई: मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा उपक्रम असलेल्या पोलिटिकल जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशन (PJWA) या नोंदणीकृत ट्रस्टच्या अध्यक्षपदी विवेक भावसार (Vivek Bhavsar) यांची तर सचिवपदी मंदार पारकर (Mandar Parkar) यांची बिनविरोध निवड झाली. जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ अशा तीन वर्षासाठी ही निवड झाली आहे.

मंत्रालय आणि वार्ताहर संघाच्या सदस्यांच्या प्रामुख्याने आरोग्यविषयक कल्याणाचे (health related welfare) हीत डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या पोलिटिकल जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनची नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली.

असोसिएशनतर्फे आरोग्य शिबीर (health camp) , तपासण्या आयोजित करण्यासोबतच असोसिएशनचे सदस्य असलेल्या पत्रकारांना आजारपणात आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासह स्मरणिका प्रकाशन, पत्रकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, अभ्यास दौरा (study tour) आयोजित करणे यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.

पत्रकारांना आरोग्यविषयक आर्थिक मदत करता यावी यासाठी 5 कोटी रुपयांचा राखीव निधी (corpus fund) उभे करण्याचा संकल्प नूतन कार्यकारिणीने सोडला आहे.

असोसिएशनचे पदाधिकारी याप्रमाणे – अध्यक्ष – विवेक भावसार (द न्यूज 21), उपाध्यक्ष – चंदन शिरवाळे (पुढारी), सचिव – मंदार पारकर (पुण्यनगरी), उप सचिव – सुरेश ठमके (इ टीव्ही भारत), खजिनदार – दिलीप सपाटे (पुढारी), कार्यकारी सदस्य – खंडूराज गायकवाड (दै सांज महानगरी), श्याम हांडे (कर्नाटक मल्ला), वैशाली होगले (खबरे आज तक) आणि नितीन तोरसकर (इंडिया ग्राउंड रिपोर्ट).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here