@maharashtracity

प्रसुतिगृहाचे आधुनिकीकरण – महापौर

नायगाव प्रसूतिगृहाचे ‘त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर प्रसूतिगृह’ नामकरण

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी समाजातील श्रेष्ठ- कनिष्ठ भेदाभेद नष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांचा हाच सिद्धांत पुढे नेऊन आम्ही सामाजिक विकास साधणार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केले.

कोकणातील (Konkan) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळी भेट देणारे रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) हे पहिले राष्ट्रपती आहेत, असेही ते म्हणाले.

नायगाव येथील प्रसूतिगृहाचे ‘त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर प्रसूतिगृह’ असे नामकरण रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजावर अनंत उपकार -: महापौर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान उपलब्ध करून दिले. त्यांनी समाजावर अनंत उपकार केले आहेत. जगात डॉ. बाबासाहेबांच्या कामांची उल्लेखनीय नोंद आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी यावेळी केले.

डॉ.आंबेडकरांमुळे महिलांना प्रसूती रजा मंजूर झाली. ग्रंथ कमी पडतील इतके उत्तुंग काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. मला सोन्याचे दागिने नको, कुंकू हेच माझे दागिने आहे, असा अमूल्य विचार माता रमाई यांनी मांडला, असे महापौरांनी सांगितले.

..तरच डॉ. आंबेडकरांना अपेक्षित भारत घडेल -: खा. राहुल शेवाळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हा लोकप्रतिनिधींना सन्मान मिळाला आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला स्वप्नातील भारत आपण घडवू शकतो. महापालिकेने नामकरणाचा कार्यक्रम घेऊन माता रमाई यांचा शासकीय सन्मान केला आहे. त्यागमूर्ती माता रमाई यांचे अमूल्य योगदान आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी यावेळी केले.

नऊ मजली अत्याधुनिक प्रसूतिगृह बनवावे – आ. कालिदास कोळंबकर

नायगाव प्रसूतिगृहाच्या नामकरणाला प्रथम मी
पाठिंबा दिला होता. तसेच, चैत्यभूमी येथे भीमज्योत बसविण्याची कार्यवाही पूर्ण केली. हे प्रसूतिगृह कमीत कमी नऊ मजली होऊन ते अत्याधुनिक झाले पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर (BJP MLA Kalidas Kolambkar) यांनी यावेळी केली.

माता रमाई दैवत – यशवंत जाधव

माता रमाई हे आपले दैवत आहे. आजचा कार्यक्रम हा अभूतपूर्व असून नामकरण समारंभास सहकार्य करण्यासाठी उपस्थित सर्वांचा यामध्ये वाटा आहे. आम्हाला अपेक्षित असलेले प्रसूतिगृह आधुनिकीकरणासह लवकरच उभे राहील, असे प्रतिपादन पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी यावेळी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांनाही न्याय दिला – आनंदराज आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुरुषांच्या बरोबरीने महिलांना न्याय दिला आहे. त्यांचा यथोचित कार्यक्रम आज येथे होत आहे. आजच्या नामकरण समारंभामुळे चांगला संदेश जनमानसात पोहोचला आहे, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकरांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here