maharashtracity
संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि शस्त्रक्रियेच्या कारणांची शक्यता
मुंबई: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ( Possible third wave of corona) , विधान परिषद निवडणूकांची ( Legislative Council elections) धामधुम आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM uddhav thackeray) यांच्यावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया या शक्यतांवर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ( Winter session) जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवाय हे अधिवेशन नागपूर ( nagpur) ऐवजी मुंबईत होण्याची शक्यता ही सांगितली जात आहे.
दरम्यान हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे होईल असे घोषित करण्यात आले असले तरी अद्याप मंत्रालय पातळीवर अधिवेशनाची कोणतीच तयारी दिसून येत नाही.
आतापर्यंत महिनाभर आधीपासून अधिवेशनाच्या इतर सुसज्जतेसाठी सुरुवात करण्यात येते. यात कामकाज सल्लागार समितीची (Advisory Committee) महिनाभर आधी बैठक होऊन नियोजन करण्यात येते.
Also Read: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
बैठकीत अधिवेशनाचे प्राथमिक कामकाज ठरविण्यात येते. यावेळी मात्र सल्लागार समितीच्या बैठकीबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून विधानमंडळ सचिवालयाला कोणतीही सुचना अद्याप आली नसल्याचे समजत आहे. यातूनच अधिवेशन पुढे ढकलण्याचा अंदाज केला जात आहे.
शिवाय हिवाळी अधिवेशनात मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, पोलीस अशांची गर्दी होणार असून अद्याप कोरोनाचे संकट दूर झाले नसल्याने राज्य सरकार नागपूर अधिवेशनाबाबत धोका पत्करण्यास तयार नसल्याचेही समजत आहे.
त्यातून नागपूर ऐवजी मुंबईचा पर्याय स्वीकारण्याची देखील दाट शक्यता आहे. शिवाय विधानमंडळ सचिवालयाने मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी अधिवेशन घेण्याची तयारी ठेवली आहे.