विधानसभा (Assembly) निवडणूकीसाठी (poll) मुंबई (Mumbai) शहर जिल्हा सज्ज असून विधानसभा निवडणूकीसाठी मतदान (polling) प्रक्रियेत महिला (women) अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने एक प्रकारे प्रशासकीय महिला राजच (Mahila Raj) आहे. यात विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India – ECI) जिल्ह्यासाठी नेमलेल्या निवडणूक निरीक्षकांतही वरिष्ठ प्रशासकीय महिला अधिकारी यांची विशेष भर पडली आहे.

नियुक्त प्रशासकीय अधिकारी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून श्रीमती शैली किशनानी (भा.प्र.से – IAS)), श्रीमती सलमा फहीम(भा.प्र.से), केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्रीमती शशि प्रभा द्विवेदी(भा.पो.से- IPS), केंद्रीय निवडणूक विशेष खर्च निरीक्षक श्रीमती मधु महाजन(भा.म.से), यांची नेमणूक जिल्ह्यात झाली असून अत्यंत प्रभावीपणे निवडणूक कामी त्या मार्गदर्शन करीत आहेत.

मुंबई शहर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी (Dy Collector) व उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांच्या सक्षम कार्यपध्दतीने लोकसभेची निवडणूकसुध्दा सहजतेने संपन्न झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनात विधानसभेची निवडणूक देखील होत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी सारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या माहिम मतदारसंघ श्रीमती स्वाती कार्ले आणि वरळी मतदारसंघ श्रीमती सुषमा सातपुते या सांभाळत आहेत. त्यांच्या मदतीला सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार असलेल्या श्रीमती ज्योती शेगावकर, शिल्पा कामथे, लता गुरव, अरुणा पंडित जाधव, पल्लवी तभाने, आशा शेंडगे-तामखडे, कोमल ठाकूर, मिनल दळवी, नायब तहसिलदार ज्योती खामकर, भक्ती दादरकर, गुलाब मोरे, अवंती मयेकर, या खंबीरपणे साथ देत आहेत.

महिला समन्वय अधिकारी केवळ महसूलच नव्हे तर इतरही विभागातीलही महिला अधिकारी निवडणूक कामी आपले योगदान देत आहेत. यात जिल्हा सूचना अधिकारी कविता पाटील व त्यांचे सहकारी सर्व तांत्रिक बाजू सांभाळून सुलभ कामकाज करीत आहेत. लेखा अधिकारी श्रीमती अनुराधा शेवडे, सहा. लेखाधिकारी श्रीमती पूर्वा गवस या निवडणूक खर्च व्यवस्थापन पाहत आहेत.

दिव्यांग मतदार वाढविणेसाठी प्रयत्न करणे व त्यास मतदान केंद्रावर सोयी सुविधा पुरविणे हे काम संशोधन अधिकारी तथा जात पडताळणी अधिकारी, मुंबई शहर श्रीमती ममता शेरे या करीत आहेत. मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा सुविधा पुरविणे यासाठी श्रीमती पद्माजा केसकर यांची नियुक्ती आहे. तर माध्यम कक्षातील महिला अधिकारी श्रीमती काशीबाई थोरात, दैवता पाटील, वैदेही मोरे प्रसार माध्यम समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

या प्रमुख महिला अधिकाऱ्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेत नियुक्त केलेल्या 11473 अधिकारी/कर्मचाऱ्यांपैकी 4578 महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या मार्फत प्रत्यक्ष निवडणूकीचे कामकाज बुथ लेवल व मतदान केंद्रावर होणार आहे. एकुणच मुंबई शहर जिल्ह्यात मतदानावर महिलांचे प्रशासकीय राज आहे, असे म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here