कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई: पर्यावरणाचे (environment) रक्षण करण्यासाठी प्लास्टिक (plastic) वापरणे बंद करा, असे आवाहन राज्याचे राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केले आहे. 

उत्तनमधील (Uttam) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (Rambhau Mhalagi Prabodhini) येथे आयोजित “प्लास्टिक निर्मूलन” या चर्चासत्रात ते बोलत होते. प्लास्टिकचा दररोज वापर वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असेही कोश्यारी म्हणाले.  

एक जबाबदार नागरिक म्हणून प्लास्टिकचा वापर टाळल्यास देशाला या संकटातून मुक्त करणे सहज शक्य आहे, असे कोश्यारी यांनी सांगितले. प्लास्टिक हा आपला शत्रू नाही परंतु मोठ्या प्रमाणावर याचा वापर करणे टाळले पाहिजे, असेही ते म्हणाले. प्लास्टिक वापर टाळला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. 

राज्यपाल म्हणाले, “जिथे इच्छाशक्ती असेल तिथे मार्ग आहे. जर  प्लास्टिक वापरावर नियंत्रित ठेवायचे असेल तर लोकांना शाश्वत पर्याय देण्याची गरज आहे,. प्रबोधिनींनी प्लास्टिक निर्मूलनाच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून तो सरकारला द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here