ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच शिवसेनेने ग्रामीण भागाच्या विकासाला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्य करताना शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांची विकासाप्रती भूमिका जवळून पाहता आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, असे सुभाष पवार यांनी स्पष्ट केले. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच अग्रक्रम दिला. शिवसेनेने कधीही पक्षभेद केला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ठाणे जिल्ह्यातील तळागाळापर्यंत शिवसेनेला आणखी मजबूत करण्यासाठी कार्य करणार आहोत. इतर पक्षात प्रवेश करताना त्या पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी असते. मात्र, शिवसेनेत प्रवेश करताना शिवसैनिकांचा उत्साह पाहावयास मिळत असल्याचे पवार यांनी आवर्जून नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here