बृहन्मुंबई मनपा पेन्शनर्स असोसिएशनतर्फ़े मार्गदर्शन शिबिर

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेत (BMC) प्रामाणिकपणे काम करून सेवा निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना अनेक वर्षांपासून भेडसावणारी हक्काच्या निवृत्ती वेतनाची (pension) समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्यासाठी बृहन्मुंबई मनपा पेन्शनर्स असोसिएशनतर्फ़े विरंगुळा केंद्र, सागर विहार उद्यान, सेक्टर ०८, चेनाब हॉटेलजवळ, वाशी (नवी मुंबई) येथे दुपारी ३.३० वाजता परिसंवाद आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे.

यासंदर्भातील माहिती पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर, मुंबई महापालिका सुरक्षा दलाचे माजी उपप्रमुख अधिकारी अभय चौबळ यांनी दिली.

मुंबई महापालिकेत सेवा निवृत्तीपर्यंत अविरत काम करणाऱ्या ७० – ७५ टक्के निवृत्ती वेतन धारकांना निवृत्तीनंतर कोणकोणते आर्थिक लाभ मिळतात, याची पुरेशी माहितीही नसते. तसेच, हजारो सेवा निवृत्त धारकांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी वर्षनुवर्षं पालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. तसेच, या हक्काच्या पैशांसाठी काही भ्रष्ट अधिकारी ‘चहा- पाणी’ घेतात. त्यामुळे या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी परिसंवादाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यांना हक्काची देणी देण्यास महापालिकेला भाग पाडण्यात येणार आहे.

या शिबिरात बृहन्मुंबई मनपा पेन्शनर्स असोसिएशनचे (BMC Pensioners Association) अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर, विद्यमान उपाध्यक्ष कुटुंबे, आयोजक सतीश वाणी, माजी उपप्रमुख सुरक्षा अधिकारी अभय माधव चौबळ आदी मार्गदर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here