Google search engine

AboutFounder

गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत असलेले विवेक भावसार हे महाराष्ट्र. city या मराठी न्यूज पोर्टलचे संस्थापक आहेत. ते कल्पक डिजिटल मीडिया एल एल पी या माध्यम समुहाचे समूह संपादक आहेत. विवेक भावसार यांनी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रात राजकीय आणि शोध पत्रकारिता केली आहे. १९९३ मध्ये धुळे येथील दैनिक आपला महाराष्ट्र या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खान्देशात पुढाकार घेतलेल वृत्तपत्रातून पूर्णवेळ पत्रकारितेला सुरुवात केली. मुंबईत आल्यावर त्यांनी लोकमत, सामना या मराठी वृत्तपत्रासह The Asian Age आणि Free Press Journal या इंग्रजी वृत्तपत्रांत काम केले. सन १९९३ च्या आधी १९८८ पासून ते लोकमत, गावकरी व अन्य मासिकात स्फुट लेखन करत होते. त्यांनी समृद्धी महामार्ग जमीन संपादनातील अनियमितता, तूर डाळ खरेदी घोटाळा उघसकीस आणला. विवेक भावसार यांनी नाणार या प्रकल्प परिसरातील जमिनीत झालेल्या गुंतवणूक सर्वप्रथम उघडकीस आणल्याने हा प्रकल्पच सरकारला रद्द करावा लागला होता.