म्युनिसिपल मजदूर युनियनची मागणी

Twitter : @maharashtracity

मुंबई :

औरंगाबाद खंडपीठाकडून नुकतेच वाल्मिकी, मेहतर व भंगी या जाती प्रवर्गाला वारसा हक्काचा लाभ देण्याबाबत सूट देण्यात आली आहे. या प्रवर्गातील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यासही स्थगिती उठवून जात, पात, धर्म असा भेदभाव न करता इतर जाती धर्मातील सफाई कामगारांवर अन्याय दूर कारण्यासाठी लाड-पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे कोणत्याही जाती धर्मातील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने लाभ द्यावेत, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनकडून करण्यात आली आहे.  

यावर बोलताना म्युनिसिपल मजूदर युनियनचे सहा. सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले की, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा येथील सफाई कामगारांना लाडपागे समिती शिफरशीच्या अनुषंगाने खात्यांतर्गत ड संवर्गात भरतीने नियुक्त झालेल्या सफाई कामगारांस पदोन्नतीनंतर चतुर्थ श्रेणीत पदोन्नती दिल्यास कामगारास वारसाहक्काच्या नियमास बाधा येणार नाही. या निकषामुळे अनेक वंचित कामगारांच्चा वारसास वारसाहक्काचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला होता. मात्र शासनाच्या पत्रान्वये उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिकेवर एप्रिल महिन्यात दिलेल्या आदेशात केवळ वाल्मिकी, मेहेतर व भंगी या जाती प्रवर्गातील सफाई कामगारांच्या पात्र वारसांवर वारसा हक्काने नियुक्ती देण्यापासून सूट देण्यात आल्याचे नमूद केले आहे.

नारकर म्हणाले, दुसऱ्या बाजूला या प्रवर्गाव्यतिरिक्त इतर जाती प्रवर्गातील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यास स्थगिती दिलेली आहे. यामुळे कामगारांच्या मनात असंतोषाची भावना आहे. त्यामुळे सफाई कामगार या संवर्गामध्ये जात, धर्म, पात असा भेदभाव न करता सर्व जाती धर्मातील सफाई कामगारांना एकाच न्यायाने न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही जाती धर्मावर अन्याय होणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घ्यावा. सर्वोच्च न्यालयात दाद मागण्यासाठी देण्यात आलेली स्थगिती उठवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी म्युनिसिपील मजदूर युनियनकडून करण्यात आली असल्याचे सहा. सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here