Twitter : @maharashtacity
मुंबई
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य अहवालानुसार या आठवड्यात पावसाळी आजार घटल्याचे दिसून येत आहेत. मात्र या रुग्णांची संख्या १ ते ३ सप्टेंबर अशा चारच दिवसातील असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट कले आहे. यात हिवताप ५७, लेप्टो १४, डेंग्यू ३२, गॅस्ट्रो ७४, हेपेटायटीस १३ चिकनगुनिया आणि एच१एन१ असे अनुक्रमे ३ व १ रुग्णसंख्या आहेत.
दरम्यान, रुग्णसंख्या चार दिवसांची असल्याने मागील आठवड्यातील रुग्णसंख्येशी तुलना करण्यास आली नाही. जुलै महिन्यातच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुनिया या रुग्णसंख्येत सौम्य वाढ झाली आहे. मुंबईत मागील काही दिवसापासून अधून मधून पाऊस पडत आहे. एडिस डासांच्या उत्पत्तीसाठी हे वातावरण पोषक असते. त्यामुळे डेंगी आणि चिकनगुनिया रुग्णसंख्येत वाढत होताना दिसून येत आहे. म्हणून नागरिकांनी घरात, परिसरात, सोसाट्यामध्ये एडीस डासांची उत्पत्ती होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तर लेप्टा गॅस्ट्रो आणि हेपेटायटीस रुग्णसंख्येत घट झालेली दिसून येत आहे. मात्र सध्या रिपोटींग युनिट २२ वरुन ८८० एवढी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. यामध्ये महापालिकेचे रुग्णालये दवाखाने खासगी प्रयोगशाळा खासगी रुग्णलोय यांचा समावेश आहे. दरम्यान, घरोघरी जाऊन १९,७३,७२० एवढ्या तापग्रस्त रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ७६,०६,४८१ एवढी घरांचे सर्वेक्षण संख्या आहे. तर यात १,८१,६२४ एवढ्या जणांचे एकूण रक्तनमुने घेण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.