महाराष्ट्र.city हे कल्पक डिजिटल मीडिया एल एल पी या प्रकाशन समुहाचे दुसरे आणि मराठी बातम्या प्रकाशित करणारे अपत्य. TheNews21 हे इंग्रजी बातम्या देणारे डिजिटल पोर्टल सप्टेंबर २०१९ पासून प्रकाशित होत आहे.
महाराष्ट्रात असंख्य मराठी बातम्या देणारे पोर्टल असतांना आणखी नव्याची भर, अशी याची ओळख नसेल यासाठी टीम महाराष्ट्र काम करेल. यात केवळ राजकीय बातम्या नसतील तर घडलेल्या घटनेचे राजकीय विश्लेषण असेल. बातमीमागची बातमी देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
बातम्या असतील, विचार असतील, दिशा देणारे स्फुट लेख असतील.
महाराष्ट्र.city हे स्वतंत्र विचारांचे पोर्टल आहे. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्यांचा आर्थिक पाठींबा – फंड घेत नाही. आम्ही पेड न्यूज ला विरोध करतो आणि पेड न्यूज प्रसिद्ध करत नाही.