@vivekbhavsar

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा (cabinet expansion) लवकरच विस्तार आणि फेरबदल होणार आहे. या विस्तारामध्ये महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीमध्ये नारायण राणे यांच्या नावाचा विचार देखील झालेला नाही अशी माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली.

‘महाराष्ट्रसिटी’ कडे उपलब्ध झालेल्या संभाव्य यादीमध्ये महाराष्ट्रातून एकाही नावाचा विचार झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एका मंत्र्याला नारळ दिला जाऊ शकतो तर दुसर्‍या एका मंत्र्यांकडील एक खाते काढून घेणार असल्याचे समजते.

भाजपच्या ९ सदस्यांच्या नावाचा विचार झाला आहे. अन्य तीन सदस्य जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पार्टीचे सदस्य असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट होणारे संभाव्य नावे याप्रमाणे आहेत.

१. ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश) (राज्यसभा सदस्य)
२. सरबनानंद सोनोवाल (आसाम) (माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार)
३. सुशील मोदी (बिहार) (माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा सदस्य)
४. त्रिवेंद्र सिंग रावत (संघ स्वयंसेवक आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री)
५. दिनेश त्रिवेदी (पश्चिम बंगाल) (राज्यसभेचे माजी सदस्य)
६. भुपेंदर यादव (राज्यसभा सदस्य, राजस्थान)
७. अश्विनी वैष्णव (राज्यसभा सदस्य, ओडिशा)
८. वरुण गांधी (लोकसभा सदस्य, पिलीभीत, उत्तर प्रदेश)
९. जम्यांग सेरिंग नामग्याल (Jamyang Tsering Namgyal) (लोकसभा सदस्य, लडाख)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here