@sheetaltara

अक्षर कला वारीचे हे तिसरे वर्ष आहे. सुरुवातीला मला असं अजिबात वाटलं नव्हतं की हा उपक्रम तीन वर्ष चालेल आणि जगभरातल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचल. लोक मोठ्या उत्कंठेने याची वाट बघतील. मी खरं तर माझ्या स्वतःच्या समाधानासाठी विठ्ठल (Vitthal) रेखाटायचे.

शीतलताराबद्दल-

मला जन्मा पंढरपुरातला, प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. नंतर MBA Systems करण्यासाठी मुंबईत (Mumbai) आले आणि सध्या कामानिमित्त गेली ३ वर्षे बोस्टन (यु एस) (Boston US) येथे असते.

विठोबाचे संस्कार, भाषा कळायला लागली तेव्हापासूनच होऊ लागले. नेणिवेच्या पातळीवर विठोबाने मनाचा एक कोपरा व्यापलेला होता. इतर चित्र काढताना त्यामुळे थोडी प्लॅनिंग असते. मला आधी माहिती असतं की आपण काय करणार आहोत.

पण अक्षर कलावारी मधली आश्चर्याची गोष्ट अशी की समोर कॅनवास असला की त्यावर विठ्ठल प्रकट होत जातो. ‘निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा कॅनवासवर, अशी माझी काहीशी भावना होते.

असा अनुभव मला नेहमी येतो. तिथं विठ्ठल मनामध्ये असतो आणि त्याचं रूप प्रकट होताना मी फक्त निमित्तमात्र पुरते. ती कलाकृती जशी पूर्ण होते, तसा माझ्या मनात विचार येतो, की हे चित्र प्लॅन करून आलं असतं का? प्रश्नांच्या मालिकेने माझं मन भरून जातं.

अक्षर कलावारी कशी साकारली?

विठ्ठल आपल्या अक्षरात उतरावा, म्हणून मी आणि अभंग लिहून पाहिले. ते खूप छान आले, मित्रमंडळींना आवडले. मग मी २०१७ पासून अक्षर कला वारी हा उपक्रम करायला लागले. तेव्हापासूनच हे चौथे वर्ष.

या चित्रांमध्ये फक्त कॅलिग्राफी न ठेवता मी विठ्ठल सुद्धा रेखाटायचे ठरवले. याचं कारण असं होतं, गणपती किंवा कृष्ण यांचं जसे रेखाटन होतं, जसं कलाकृतींमध्ये हे जगभर प्रसिद्ध आहेत, तसा विठ्ठल प्रसिद्ध नाहीये. रेखांकन करण्यासाठी म्हणजेच इलेस्ट्रेशन करण्यासाठी, मूळ रुपाला एक गाभा असावा लागतो. खूप कमी आकार किंवा कृतींमधून मूळ रूपाचा अर्थबोध व्हावा लागतो.

हे सर्व विठ्ठलाचे ठाई आहे. पण तरीही विठ्ठलाचे इलेस्ट्रेशन खूप कमी आहेत. वारीच्या निमित्ताने विठ्ठल जेवढा पाहिला जातो, तेवढा रेखाटला जात नाही. डिझाइन्स मध्ये येत नाही. म्हणून मला असं वाटत होतं, आपण कॅलिग्राफी सोबत विठ्ठल रूप सुद्धा चित्राकृती मध्ये रेखाटूया आणि सर्वांनी ही आयडीया उचलून धरली, कमी वेळात अतिशय लोकप्रिय झाली.

यंदा काय विशेष?

काळ्यासावळ्या विठ्ठलाला एक ऑरा आहे असं मी नेहमी सांगते. दरवर्षी नवीन नवीन संत आणि त्यांचे युनिक अभंग यांचा समावेश मी कलाकृती मध्ये करायचा प्रयत्न करत असते. आता कोरोना आहे म्हणून अन्यथा इतर वेळी वर्षी १ जुलैला वारी सुरू होते. साधारणपणे २२ ते २५ दिवस वारी चालते.

ही बाब लक्षात घेऊन रोज एका वेगळ्या अभंगाचे सुलेखन आणि एक वेगळं अमूर्त चित्र असं कलाकृतीचे स्वरूप ठरवले. खरं तर कितीही वेळा विठ्ठलाचे रूप समोर आले तरीही समाधान होत नाही. म्हणून वेगवेगळ्या रुपात विठ्ठल स्वरूपाची कल्पना करणे एक नितांत सुंदर अनुभव असतो. Work From Home हा गेल्या दीड वर्षात परवलीचा शब्द झाला आहे, तसंच Worship from where you are हा भाव मांडण्याचा माझा प्रयत्न आहे.

पंढरपूरात दरवर्षी वारी असते. लाखो लोक विठ्ठलाच्या ओढीनं वारीच्या तयारीला लागतात. खेड्यापाड्यांतून, गाव-शहरांमधून दिंड्या, पालख्या पांडुरंगाच्या ओढीनं निघतात. वारकरी टाळ-मृदंगांच्या गजरात, खांद्यावर पताका घेऊन, हरिनाम उच्चारत पंढरीला (Pandhari) जातात. या वारीच्या सोहळ्याला आपल्याला जाता येणार नाही अशी खूप खंत वाटते.

हाती असलेली कला हे पंढरीच्या त्या वातावरणाशी जोडले जाण्याचे माध्यम असावे या दृष्टीने मी सुलेखनाकडे पाहते. १ जुलै पासून माझ्या ट्विटर हॅन्डल @sheetaltara आणि इंस्टाग्राम हॅन्डल @sheetaltara21 वर रोज एक कलाकृती सादर करत आहे. #अक्षरकलावारी हा हॅशटॅग फॉलो करायला विसरू नका.

माझं कॅलिग्राफीचा (calligraphy) फॉर्मल शिक्षण झालेलं नाहीये. पण सरावाने सगळं काही करू शकता. पेन्सिल पेपर हेच माझ्या सर्व कलाकृतींच्या मुळाशी आहेत. रेखाटण्यासाठी किंवा कलाकृतीची आऊटलाईन तयार करण्यासाठी.

मी अनेक आकृत्या रेखाटून पाहते. हल्ली त्यासाठी प्रो क्रिएट ची मदत घेते. पण शेवटी कलाकृतीही रंग ब्रश मार्कर्स आणि पेन याच सामान्य साधनांनी करते.

सगळेच अभंग कॅलिग्राफ करता येण्यासारखे असतात. पण कुठल्या शब्दांना कॅलिग्राफी केल्यामुळे त्या अभंगाचे सौंदर्य वाढेल, हा विचार त्या निवडीमागे असतो. अभंग शोधावे कधीच लागत नाहीत, निवडावे मात्र लागतात.

  • शितलतारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here