@maharashtracity

पंढरपूर: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला शिव आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण उपक्रम यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अत्याधुनिक एएलएस रुग्णवाहिकेची (ambulance) चावी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या (Dr Shrikant Shinde Foundation) माध्यमातून ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे.

यावेळी श्रीमती रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar), शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, समिती सदस्य संभाजी राजे शिंदे आदी जण उपस्थित होते.

यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मागणी आम्ही डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडे केली होती. आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या ताब्यात ही रुग्णवाहिका मिळत असल्याचा विशेष आनंद होत आहे. ही रुग्णवाहिका पंढरपूर परिसरातील गरजू रुग्णांना आधार ठरेल, असा विश्वास श्री औसेकर महाराज यांनी व्यक्त केला.

यावेळी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी संयुक्तपणे संपादित केलेल्या वैद्यकीय मदत मार्गदर्शक या ग्रंथाच्या प्रति सर्व मान्यवरांना भेट देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here