Twitter : @maharashtracity

मुंबई

हरे कृष्ण मुव्हमेंटच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येवर भक्तीमय सोहळ्याचे आयोजन मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे संस्थेचे अध्यक्ष श्रीमान अमितासना दास प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 
शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार आदित्य ठाकरे, सचिन अहिर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कुटुंबिय, नगरसेविका हर्षिदा नार्वेकर, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री आणि कार्यकारी संचालिका रुपा नाईक, महाराष्ट्र शासनाचे विविध विभागाचे वरिष्ठ सनदी, पोलिस अधिकारी तसेच अन्य प्रतिष्ठित मान्यवर भक्तगण यावेळी उपस्थित होते. लड्डू गोपाळचे सुरेख रुप अनुभवत करण्यात आलेला पुष्पअभिषेक, ब्रह्मसंहितेचे पठण, कीर्तन-प्रवचन, महाआरती त्यानंतर रंगलेले प्रश्नमंजुषा सारखे विविध कार्यक्रम उपस्थितांना अनुभवता आले. 

श्रीमान अमितासना दास प्रभू यांच्या मधुर वाणीच्या प्रवचनाही श्रोत्यांनी आनंद घेतला. मंत्रोच्चार आणि श्रीकृष्णा जयघोष करत हा सोहळा उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने करण्यात आलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रात्री उशीरापर्यंत भाविकांचे गर्दी होती. यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here