@maharashtracity

मुंबई: दिवाळीत गावी गेलेल्या नागरिकांमुळे दिवाळीनंतर दरवर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. हा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने वाडिया रुग्णालयाच्या (Wadia Hospital) मदतीने मुंबई नागरिक परिवाराकडून सुरुवात झालेल्या रक्तदान शिबिराला (Blood donation camp) यंदा १३ वर्ष पूर्ण झाली. या वर्षी या शिबिरात तब्बल १५५ हुन अधिक नागरिकांनी रक्तदान केले.

झुंज प्रतिष्ठान सेवाभावी संस्था, मुंबई नागरिक सहकारी पतसंस्था, जेरबाई वाडिया हॉस्पिटल यांची मदत घेऊन रविवार ता. १४ रोजी रक्तदानाचे आयोजन केले. लालबाग येथील ललित कला भवन, साने गुरुजी मार्ग येथील कामगार कल्याण केंद्रात हे शिबिर आयोजित केले होते.

रक्तदान शिबिराला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत या रक्तदान शिबिरात १५५ हुन अधिक नागरिकांनी रक्तदान केले, अशी माहिती उपाध्यक्ष आशिष भालेराव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here