@maharashtracity

मुंबई: मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो चिकनगुनिया या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या आजारांचा मुंबईत धोका कायम असून मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुंबईकरांना आवश्यक त्या सुचना देण्यात येत आहेत.

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी साथीचे आजार (epidemic diseases) डोके वर काढत आहेत. गेल्या २१ ते २८ नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे ३३५, लेप्टो १०, डेंग्यू १०४, गॅस्ट्रो २८०, कावीळ ३७, चिकनगुनिया १६ तर एच१एन१चा १ रुग्ण आढळून आला आहे.

दरम्यान मागच्या आठवड्यात मलेरिया २३४, लेप्टो ६, डेंग्यू ९१, गॅस्ट्रो २००, काविळ २४, चिकनगुनिया १२ तर एच१एन१ चा १ रुग्ण नोंदविण्यात आला होता. दरम्यान गेल्या १८ महिन्यापासून पालिका कोरोना विरोधात लढा देत आहेत.

मुंबई पालिकेला कोरोनाची पहिली व दुसरी लाट रोखण्यात यश आले. मात्र कोरोना काळात पावसाळी साथरोगाचे संकट कायम आहे. त्यामुळे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

आठवडा आकडेवारी :
२१ ते २८ नोव्हेंबरची आकडेवारी
मलेरिया ३३५
डेंग्यू १०४
गॅस्ट्रो २८०
कावीळ ३७
चिकनगुनीया १६
लेप्टो १०
स्वाईन फ्ल्यू १

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here