@maharashtracity

मुंबई: राज्यात गुरुवारी ४,२१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ६४,८७,०२५ झाली आहे. काल २,५३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९५,२३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५०,२२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात आज ५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५५,१९,६७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८७,०२५ (११.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २,९२,५१० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ४५७

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ४५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३३८९६ एवढी झाली आहे. तर २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६००६ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here