@maharashtracity

मुंबई: राज्यात बुधवारी ४,४५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,६९,३३२ झाली आहे. काल ४,४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,७७,२३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५१,०७८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच राज्यात काल १८३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४१,५४,८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६९,३३२ (११.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९०,४२७ व्यक्ती गृह विलगिकरणात (Home Quarantine) आहेत तर २,०७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

मुंबईत दिवसभरात ४१५:

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ४१५ नव्या कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४४५७० एवढी झाली आहे. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९८१ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here