@maharashtracity

मुंबई: राज्यात बुधवारी ५,५६० नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,६९,००२ झाली आहे. आज ६,९४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६४,५७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात बुधवारी १६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२ (१२.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात २८५

मुंबईत दिवसभरात २८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३८२३९ एवढी झाली आहे. तर ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५९६८ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here