@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ५,७८७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,८७,८६३ झाली आहे. काल ५,३५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,८६,२२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ६३,२६२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात काल १३४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०७,५९,७६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,८७,८६३ (१२.५८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३,७३,८१२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २,५१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. काल ठाणे मंडळातील कोविड मृत्यूंचे रिकाँन्सिलिएशन करण्यात आल्याने या मंडळाच्या आणि राज्याच्या एकूण कोविड मृत्यूमध्ये ४५ ने वाढ झाली आहे तर कोविडेतर मृत्यूमध्ये २ ने घट झाली आहे.

मुंबईत दिवसभरात २६५

मुंबईत (Mumbai) दिवसभरात २६५ नव्या कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३९०६९ एवढी झाली आहे. तर ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९७७ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here