@maharashtracity

मुंबई, डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे प्रत्येकी 1 तर पिंपरी चिंचवड 2 रूग्ण

मुंबई: राज्यात आफ्रिकासह इतर ओमिक्रोन (omicron) प्रभावित जोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांमध्ये 6 प्रवासी कोविड बाधित आढळलेले आहेत.

मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर आणि पुणे या भागातील प्रत्येकी 1 असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नायजेरियातून (Nigeria) आलेले दोन प्रवासी कोविडबाधित (covid patient) असल्याचे सांगण्यात आले. या प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (Genome sequencing) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या प्रवाशांचे नमुने एनआय व्ही पुणे (NIV Pune) येथे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. हे सर्व प्रवासी कोविड बाधित असले तरी लक्षणेविरहित (asymptomatic) अथवा सौम्य लक्षणाचे आहेत.

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. युरोप (Europe) आणि ओमिक्रॉन प्रभावित 11 देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येकाची आर टी पी सी आर टेस्ट (RTPCR test) करण्यात येत असून कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहेत.

जे प्रवासी आर टी पी सी आर निगेटिव्ह आढळतील त्यांनाही 7 दिवसांच्या क्वारंटाईननंतर (quarantine) पुन्हा टेस्ट करण्यात येणार. असे कोविड बाधित असलेल्या नमुन्याचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येणार आहे.

जे प्रवासी ओमिक्रॉन सापडलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांतून येणार आहेत त्यांच्यातील देखील 5 टक्के प्रवाशांची प्रयोगशाळा तपासणी करून त्यातील पॉझिटिव्ह नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत.

विषाणू मध्ये बदल होणे (mutation) ही नैसर्गिक प्रक्रिया असून दैनंदिन व्यवहारात कोविड अनुरुप वर्तन वापरल्यास कमी धोका आहे. तसेच लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here