मुंबई: मुंबई येथून गोवा येथे २ हजार प्रवाशांना घेऊन गेलेले ‘कोर्डलिया’ क्रूझवर (Cordelia Cruise) कोविड बाधित प्रवासी असल्याने या क्रूझला गोवा सरकारने (Goa Government) परत मुंबईला पाठवले.

ही क्रूझ ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत (Mumbai) परतली असून या क्रूझवरील ६६ प्रवासी कोविड बाधित (covid affected passengers) आढळून आले आहेत. त्यांना उपचारासाठी भायखळा (Byculla) येथील रिचार्ड्सन अँड क्रुड्स कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबई येथून २ हजार पर्यटक (tourists) प्रवाशांना कोर्डलिया क्रूझद्वारे गोवा येथे नेमण्यात आले होते. मात्र या क्रूझवरील काही प्रवाशांना कोविडची बाधा झाल्याचे समजताच गोवा सरकारने त्यांना गोव्यात न ठेवता त्यांना क्रूझद्वारे पुन्हा मुंबईला रवाना केले.

मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ही क्रूझ पर्यटक प्रवाशांना घेऊन मुंबईत धडकली. मुंबई महापालिकेने (BMC) या क्रूझमधील प्रवाशांची कोविड चाचणी केली असता त्यामधील ६६ प्रवाशांना कोविडची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यांना पालिकेने १७ आसन व्यवस्था असलेल्या ५ रुग्णवाहिकांच्या मार्फत भायखळा येथील रिचार्ड्सन अँड क्रूडस जंबो कोविड सेंटरमध्ये ठेवले असून काही प्रवाशांना नजीकच्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, या क्रूझवरील इतर प्रवाशांना आरटीपीसीआर चाचण्या (RT-PCR test) करण्यास सांगण्यात आले असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय क्रूझच्या बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांचा चाचणी अहवाल बुधवारी येणे अपेक्षित आहे. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांना त्यांच्या घरी पाठवून ७ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here