@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ६,६८६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,८२,०७६ झाली आहे.
काल ५,८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,८०,८७१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ६३,००४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात काल १५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०५,४५,५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,८२,०७६ (१२.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३,७०,८९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २,६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात २८४

मुंबईत (Mumbai) दिवसभरात २८४ नव्या कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३८८०४ एवढी झाली आहे. तर ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५९७९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here