@maharashtracity

१०१ टक्के मुंबईकरांना किमान एक तरी लस

मुंबई: एकट्या मुंबई जिल्ह्यात १ कोटी ५९ लाख ३३ हजार ०७६ डोस देण्यात आले असून यातील ६५,४०,३९२ म्हणजे ७०.३ टक्के मुंबईकरांनी आता पर्यंत दोन्ही डोस घेतले आहेत.

राज्यात मुंबई लसीकरणात (vaccination in Mumbai) अव्वल आहे. तर ९३,९२,६८४ म्हणजे १०१ टक्के मुंबईकरांनी किमान एक डोस घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, राज्यानेही ११ कोटी जणांना लसीकरण करण्याचा टप्पा पार केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्यातील लोकसंख्येच्या १० टक्के लोकसंख्या मुंबई शहरात असून राज्यात दिलेल्या एकूण डोसपैकी १४ टक्के लस एकट्या मुंबई शहरात देण्यात आले आहेत.

Also Read: शेपूट उरलयं, लस टोचून घ्याच

यावर बोलताना राज्य कोविड टास्क फोर्सचे (covid task force) सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, मुंबई शहर लसीकरणात राज्यात अव्वल असले तरीही प्रत्येक मुंबईकराने दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक आहे.

तसेच लसीकरण झाल्यावर ही कोविड वर्तणुक सोडता कामा नये. कारण सतत नवनवे वेरियंट निर्माण होत असल्याने लसीकरण पूर्ण करणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here