@maharashtracity

मुंबई: जगभरातील २३ देशांमध्ये आढळून येणाऱ्या ओमिक्रॉनच्या (Omicron) अटकावासाठी पालिकेकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना तपासणी (covid test) सुरु केली आहे. या तपासणीत ९ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याचे गुरुवारी रात्री उशिरा सांगितले.

या सर्व प्रवाशांच्या प्रवासाचा इतिहास (travel history) जाणून घेतला जात आहे. दरम्यान यातील एक व्यक्ती दक्षिण अफ्रिका (South Africa) देशातून आली असल्याचे सांगण्यात आले.

राज्याच्या शेजारील कर्नाटक (Karnataka) राज्यात गुरुवारी ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याने शेजारील राज्यांनी सावधानता बाळगण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने दिलेल्या सुचनांप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी सुरु केली आहे.

Also Read: विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच !: नाना पटोले

गुरुवारी केलेल्या तपासणीत एकूण ४८५ प्रवाशांच्या कोरोनाच्या तपासणीत ९ कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याची माहिती पालिका आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी दिली. तर नऊ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

नोव्हेंबर महिन्यापासून सुरु असलेल्या कोरोना तपासणीतून ९ रुग्ण सापडलेत. या रुग्णांपैकी केवळ एकच रुग्ण आठवड्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा प्रवास करुन मुंबईत परतला आहे. तर ३९ वर्षीय तरुण २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आला आहे. ५ रुग्ण लंडनहून (London) मुंबईत आलेत.

तसेच नोव्हेंबर महिन्यापासून लंडनहून २१ वर्षीय तरुण १० नोव्हेंबरला, २५ वर्षीय तरुण १ डिसेंबरला, ६६ वर्षीय वृद्ध १७ नोव्हेंबरला, ३४ वर्षीय १३ नोव्हेंबरला तर ४५ वर्षीय २ डिसेंबरला गुरुवारी मुंबईत (Mumbai) आलेत. त्यापैकी १ डिसेंबर रोजी परतलेल्या २५ वर्षीय तरुणाचे कोरोनाचे निदान रॅपिड एन्टिजन चाचणीतून (Rapid Antigen test) झाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागानं दिली.

उर्वरित तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आले होते. त्यापैकी ४७ वर्षीय पुरुष मॉरिशसमधून (Mauritius), ६९ वर्षीय पोर्तुगालहून (Portugal) आलेत. गुरुवारी जर्मनीहून (Germany) आलेल्या ३८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here