कांजूर येथे १७०० बेडचे कोविड सेंटर

@maharashtracity

दहा हजार बेड वाढवण्याचाही निर्णय

मुंबई: कोरोनाच्या (corona) संभाव्य़ तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेडून नवीन कोविड सेंटरही उभी केली जात आहे. यात कांजूरमार्ग इथे सिडकोच्या (CIDCO) सहकार्याने १७०० बेडचे जम्बो कोवीड केअर सेंटर (covid care centre) उभे केले जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. या सोबत आणखी दहा हजार बेड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील काकाणी म्हणाले.

मुंबईत कोरोना रूग्ण घटत असले तरी देखील तिसऱ्या लाटेचा धाक अद्याप कायम आहे. त्यानुसार महापालिकेने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची तयारी सुरु केली आहे. रुग्ण वाढल्यास बेड्स कमी पडू नयेत यासाठी नवीन जम्बो सेंटर उभारले जाणार असून त्यात दहा हजार बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. तर कांजूरमार्ग इथे १७०० बेडचे सेंटर उभारले जाणार आहे.

या दोन्ही सेंटरमध्ये ७ हजार ऑक्सीजनचे बेड (Oxygen bed) तर १५०० लहान मुलांसाठी आणि १५०० आयसीयू बेड (ICU bed) असतील. त्यामुळे एकूण ३० हजार बेड उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान, शनिवारी मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत मुंबईत बाधित रुग्णांची संख्या ७३४७७९ एवढी झाली आहे. तर ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आला होता. त्यामुळे शनिवारपर्यंत मुंबईत १५८८९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here