@maharashtracity

चालक, वाहक, प्रवाशांसह ५ गंभीर

मुंबई: दादर टी.टी. येथे बुधवारी बेस्ट उपक्रमाच्या ‘तेजस्वी’ या भरधाव बसने पुढे जाणाऱ्या एका डंपरला पाठीमागील बाजूला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक, वाहक व ६ बस प्रवासी असे एकूण ८ जण जखमी झाले असून त्यापैकी बस चालक व अन्य रुग्ण असे ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. (8 injured in BEST – Dumper mishap)

या सर्व जखमींवर पालिकेच्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) उपचार सुरू आहेत. हा अपघात का व कसा काय झाला, याबाबत स्थानिक पोलीस व बेस्ट प्रशासन यांच्याकडून चौकशी सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाची बस मार्ग क्रमांक २२ ही मरोळ मरोशी ते पायधुनी या मार्गावर चालते. २७ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास बेस्ट परिवहन विभागाच्या (यापूर्वी खास महिलांसाठी वापरण्यात येणारी बस) ‘तेजस्वी’ या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण अचानकपणे सुटले आणि या बसने पुढे धावणाऱ्या एका डंपरला जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी जोरदार व भीषण होती की बसच्या चालकाच्या केबिनसह एका बाजूला पूर्ण चक्काचूर झाला.

हा अपघात अनपेक्षित व अचानक घडल्याने बसमधील बेसावध बसवाहक, बस प्रवासी यांना काही समजण्यापूर्वीच जोरदार अपघात झाला. त्यामध्ये, बसचा चालक जबर जखमी झाला आहे. तसेच, वाहक आणि इतर ६ प्रवासी असे एकूण ८ जण जखमी झाले आहेत.

हा बेस्ट बस अपघात तेथील परिसरातील सी.सी. कॅमेरात कैद झाला आहे. त्याआधारे पोलीस तपास करीत आहेत.

गंभीर जखमींची नावे -:

१) राजेंद्र (बस चालक/ वय ५३ वर्ष
२) काशीराम धुरी (वाहक / ५७ वर्ष३)
३) ताहीर हुसेन (प्रवासी५२ वर्ष)
४) रुपाली गायकवाड (प्रवासी/३६ वर्ष)
५) सुलतान ( प्रवासी, ५० वर्ष)

प्रकृती स्थिर असलेल्या प्रवाशांची नावे -:

१) मन्सूर अली (प्रवासी/५२ वर्ष)
२) श्रावणी म्हस्के (प्रवासी/ १६ वर्ष)
३) वैदेही बामणे (प्रवासी / १७ वर्ष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here