@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) यंदाच्या दिवाळीत पालिका कर्मचाऱ्यांना व बेस्ट उपक्रमाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस जाहीर केल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांनी तोट्यात असणाऱ्या बेस्ट (BEST) उपक्रमानेही दिवाळीत भाऊबीजेसाठी बेस्टच्या १३६ जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. (Additional BEST buses on Bhau-beej)

त्यामुळे भावाला आपल्या बहिणीच्या घरी बेस्ट बसने जाऊन भाऊबीज करणे सोयीचे होणार आहे.

दिवाळीला (Diwali) सुरुवात झाली असून येत्या ६ नोव्हेंबर २०२१ रोजी भाऊबीज असून यानिमित्ताने बेस्ट उपक्रमाकडून मुंबई शहर आणि उपनगरात एकूण १३६ जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. मुंबईकर जनतेने याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here