@maharashtracity

प्रभागरचना फेरबदलांसाठी शिवसेनेकडून बाह्य एजन्सीचा वापर

निवडणूक आयोगाने निःपक्षपाती तपासणी न केल्यास न्यायालयात जाणार

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election ) पालिका आयुक्त इकबल चहल (Municipal Commissioner Iqbal Chahal ) यांनी राजकीय दबावाला बळी पडून प्रभाग फेररचना केल्याचा गंभीर आरोप भाजपतर्फे ( Maharashtra Bjp) करण्यात आला आहे.

तसेच, भाजपच्या नगरसेवकांनी ( Bjp corporators) आज पालिका मुख्यालयासमोर गांधी टोपी घालून आंदोलन केले आणि पालिका आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेऊन त्यांना गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी व्यक्त केली.

प्रभागरचना फेरबदलांसाठी शिवसेनेकडून बाह्य एजन्सीचा वापर ( Shivsena)

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने पालिका आयुक्तांच्या संगनमताने एका बाह्य खाजगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना रातोरात बनवून घेतली आहे, असा गंभीर आरोपही भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे ( BJP group leader Prabhakar Shinde) यांनी केला आहे.

यामध्ये राजकीय फायद्यासाठी शिवसेनेने प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फेरफार केला असून ह्या पुनर्रचनेमुळे संपूर्ण मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भाजपतर्फे करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने निःपक्षपाती तपासणी न केल्यास न्यायालयात ( High Court) जाणार

निवडणूक आयोग ( Election Commission ) ही स्वायत्त संस्था असल्याने निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी, अशी मागणी भाजपाने लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील, असा इशारा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here