@maharashtracity

मुंबई: एका महत्वाच्या प्रस्तावावर न बोलू दिल्याचा आरोप करीत भाजप नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन (BJP staged protest) केले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना नगरसेवक (Shiv Sena Corporators) समोर उभे ठाकले व त्यांनीही प्रतिघोषणा देत भाजपला डिवचले. त्यामुळे पालिकेत शिवसेना – भाजपात काही वेळ खडाजंगी झाली व तणावपूर्ण वातावरण होते.

यावेळी, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी, सायंकाळी उशिरापर्यंत भाजप नगरसेवकांना चहापान देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप नगरसेवकांनी सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले.

मुंबई महापालिका निवडणूक (BMC polls) जसजशी जवळ येऊ लागलीय तसतसे सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) व पहारेकरी भाजप (BJP) यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत दरवेळी भाजपच्या नगरसेवकांना बोलायला दिले जाते तरी ते जाणीवपूर्वक आरोप करतात, गोंधळ घालतात, असे सांगत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

“भाजपवाले आमच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात, आमचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याच्या बाता करतात तर मग कोविड काळात पंतप्रधानांच्या पीएम केअर फंडामध्ये (PM care fund) जो पैसे गेला त्याचा हिशोब का दिला जात नाही, त्याबाबत भाजपवाले का काही बोलत नाही”, असा सवाल यशवंत जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच, पुढील वेळी भाजपच्या नगरसेवकांनी अगोदर सांगितले तर त्या त्या विषयावर बोलायला दिले जाईल, असे सांगितले.

स्थायी समितीच्या बैठकीत, विविध ठिकाणच्या ५ पदपथ, चौकांच्या सौंदरीकरणाशी संबंधित प्रस्तावावर समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज बोलू दिले नाही, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदें (Prabhakar Shinde) यांनी केला. भ्रष्टाचार (corruption) लपविण्यासाठी भाजपची मुस्कटदाबी केली जात आहे.

यापूर्वीही, जास्त दराने टॅब खरेदी (Tab procurement) संदर्भातील प्रस्ताव, १४०० कोटी रुपये खर्चाच्या पोयसर नदी (Poisar river) विकासकामांचा प्रस्ताव आदी महत्वाच्या प्रस्तावांवरही भाजपच्या नगरसेवकांना बोलू दिले नाही, असा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here