@maharashtracity

मुंबई: शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातच कोविड टेस्ट आणि लसीकरणाची मोहिम (vaccination drive) राबविण्याच्या तयारीत मुंबई महानगरपालिका (BMC) असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात निर्बंध हटत असून यापुढे कोणताही धोका पालिकेला स्वीकारायचा नाही. शिवाय याचदरम्यान शाळा आणि महाविद्यालये सुरु झाली असून निकषात बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लसदेखील देण्यात येईल असा पालिकेचा दावा आहे.

मात्र, या शिबिरासाठी शाळा, महाविद्यालयीन प्रशासनाच्या परवानगी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आकडेवारीनुसार ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरावड्यात ७८० मुलांच्या कोविड टेस्टमधून ९ वर्षाखालील २०२ मुले पॉझिटीव्ह असल्याचे आढळली. तर १० ते १९ वयोगटातील ५७८ मुले पॉझिटीव्ह आढळून आली.

मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले की, शाळा आणि महाविद्यालयांसमोर टेस्ट आणि लसीकरणाच्या मोहिमेला विना अडथळा सुरु करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

शाळांमधून कोविड पॉझिटीव्ह मुले आढळली नसल्याचे चांगले चिन्ह असल्याचे काकाणी म्हणाले. मात्र शाळा आणि महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि मुख्याध्यापाकांना कोविड नियमांचे पालन करण्यास सांगण्यता आले आहे.

शाळांमधील मुलांच्या टेस्ट करण्याचे आम्ही ठरवत असून एखाद मुल जरी संशयित आढळून आल्यास वॉर्डात कळविण्याची सक्त ताकिद देण्यात आली असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहिम करावयाची असल्यास महाविद्यालय प्रशासनाने पालिकेला तसे कळवावे. त्वरीत सहकार्य केले जाईल असेही यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here