@maharashtracity

असंसर्गजन्य आजारांबाबत करणार जागरुकता

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दिनांक २४ नोव्हेंबरपासून तृतीयपंथीयांसाठी (transgender) आरोग्य शिबिर घेणार असून असंसर्गजन्य आजारांबाबत जागरुकता आणि माहिती या शिबिरात देण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

असंसर्गजन्य आजाराबाबत तृतीयपंथीयांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे उद्दीष्ट्य या आरोग्य शिबिरामागे (health camp) असल्याचे सांगण्यात आले. आता पर्यंत इतर मुंबईकरांच्या आरोग्य तपासणी करताना मधूमेह, रक्तदाबाची माहिती गोळा करण्यात आली असून आता तृतीयपंथीच्या आरोग्य तपासणीत ही माहिती आणि जागरुकता केली जाणार आहे.

तृतीयपंथी आरोग्याबाबत जागरुक नसून त्यांच्या रोगप्रतिकारशक्ति देखील कमी असते. अशावेळी त्यांना मधुमेह आणि रक्तदाब सारख्या असंसर्गजन्य आजाराची जाणीव ही होत नाही. यातून ते इतर आजाराला बळी पडतात. या पार्श्वभूमीवर पालिका त्यांच्यासाठी विशेष तपासणी शिबिर आणि आरोग्य कार्यशाळा आयोजित करणार आहे.

त्यामुळे पालिका आयोजित करणाऱ्या शिबिरांतून तृतीयपंथांच्या आरोग्याची स्थितीची माहिती देखील मिळणार आहे. शिवाय त्यांना असंसर्गजन्य आजारांबाबत जागरूक केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना (corona) काळात हजारो मुंबईकरांना मधुमेह (diabetic), उच्च रक्तदाब (High Blood Pressure – BP) आणि इतर असंसर्गजन्य आजार असल्याचे समोर आले. या आजारांमुळे इतर विषाणूजन्य आजार जडल्यास त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता बळावते.

दरम्यान, पालिकेकडून इतर मुंबईकरांची गेल्या वर्षीपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची तपासणी सुरू केली असून त्याची माहिती गोळा केली जात आहे. आता पालिकेने तृतीयपंथीयांच्या आरोग्याची तपासणी करण्यावर भर दिला आहे.

यावर बोलताना पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, तृतीयपंथीयांसारख्या वर्गाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तपासणीदरम्यान, जर तृतीयपंथाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या असल्याचे आढळून आले, तर त्याच्यावर उपचार सुरू केले जातील. याशिवाय पालिका तृतीयपंथांची कार्यशाळा घेऊन त्यांना इतर आजारांबद्दल जागरूक करणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here