@maharashtracity

मुंबई महानगरपालिका करणार सर्वेक्षण

मुंबई: मुंबईत गोवंडी-मानखुर्द, आरे कॉलनीतील आदिवासी (tribal) पाड्यांसोबत काही ठिकाणी कमी वजनाची मुले अद्यापही आढळून येतात. या मुलांवर उपचार केले जातात. मात्र संपूर्ण मुंबईच कुपोषित मुक्त करण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे.

त्यासाठी कुपोषित (malnourished children) मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) सर्वेक्षण सुरु केले आहे. ज्या भागात कुपोषित बालके आढळतील, त्यांच्यावर राष्ट्रीय महिला बालकल्याण योजनेअंतर्गत व मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उपचार करण्यात येतील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली.

दरम्यान, सध्या कोरोना विरोधात लढा सुरु असून कोरोनाबाधित रुग्णांचा (corona patient) शोध घेतला जात आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोना संशयितांचा शोध घेत असताना क्षय रुग्ण (TB patient) शोधण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

Also Read: नोव्हेंबर पहिल्या पंधरावड्यात तिसऱ्यांदा निचांकी

या मोहीमेतच कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात कुपोषित बालके आढळल्यानंतर त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई कुपोषित बालकमुक्त करण्याचे उद्दीष्ट्य पालिकेने समोर ठेवले असून यात राष्ट्रीय महिला बालकल्याण योजनेतून उपचार देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here