@maharashtracity

एमएमआरडीए’कडून २०१५ ला पालिकेकडे हस्तांतरीत

स्कायवॉक गंजल्याने २०१९ पासून बंद

दीड वर्षात नवीन स्कायवॉक बांधणार

कंत्राटदार १५.४० टक्के कमी दरात काम करणार

मुंबई: वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकाला (Bandra railway station) लागून असलेला व एमएमआरडीएने २००८ मध्ये बांधून पुर्ण केलेला स्कायवॉक अवघ्या १०-११ वर्षांत गंजल्याने २०१९ पासून पादचाऱ्यांच्या वापरासाठी बंद करण्यात आला आहे. आता हा स्कायवॉक पूर्णपणे पाडून त्या जागेवर मुंबई महापालिकेतर्फे १८ कोटी ६९ लाख रुपये खर्चून पुढील दीड वर्षात नव्याने स्कायवॉक उभारण्यात येणार आहे.

या स्कायवॉकच्या (skywalk) उभारणीचे कंत्राटकाम मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन हा कंत्राटदार पालिकेने अंदाजित केलेल्या १६ कोटी २० लाख रुपये खर्चाच्या १५.४० टक्के कमी दरात म्हणजे १८ कोटी ६९ लाख रुपयांत करणार आहे.

एमएमआरडिएने (MMRDA) उभारलेला स्कायवॉक कमी कालावधीत गंजल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या स्कायवॉकच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेले स्टील गंजल्याने स्कायवॉकला धोका निर्माण झाला. परिणामी हजारो पादचाऱ्यांची गैरसोय झाली.

अखेर दोन वर्षांनी या स्कायवॉकची नव्याने उभारणी करण्याच्या कामाला मुहूर्त लाभला. मुंबई महापालिकेने (BMC) हा स्कायवॉक पूर्णपणे पाडून त्या जागेवर नव्याने स्कायवॉक उभारण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. त्यावर विरोधी पक्ष व पहारेकरी भाजप (BJP corporators) नगरसेवकांकडून आक्षेप घेतला जाण्याची व त्यावर खरमरीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here