@maharashtracity

मुंबई: मुंबई शहर व उपनगरे येथील २४ वॉर्डातील पालिका उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळ्या जागा, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे यांच्या देखभालीसाठी एका वर्षाकरिता कंत्राटदारांवर तब्बल ७० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

मात्र, ही कंत्राटकामे करणारे कंत्राटदार हे किमान २२ टक्के ते ४१ टक्के कमी दरात कामे करणार असल्याने कमी दरात चांगल्या दर्जाची कामे होणार कशी, असे सवाल विरोधी पक्ष अथवा पालिकेतील पहारेकरी भाजपच्या नगरसेवकांकडून (BJP Corporators) उपस्थित केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा प्रस्ताव वादग्रस्त ठरणार आहे.

वास्तविक, मुंबईतील पालिकेची उद्याने (Gardens), मैदाने (open grounds), मनोरंजन मैदाने (recreation grounds), मोकळ्या जागा, रस्ते दुभाजक (road divider), वाहतूक बेटे यांच्या उभारणीवर व पुढे देखभालीवर पालिका प्रशासन कोट्यवधी रुपये उधळले. तरीही पालिकेच्या उद्यानात स्वच्छतेचा अभाव असतो.

Also Read: वांद्रे स्कायवॉक ११ वर्षात गंजला; नवीन स्कायवॉकवर १९ कोटी खर्च करणार!

मनोरंजन खेळणी तुटक्या अवस्थेत, हिरवळ हरवलेली असते. दिवाबत्ती व्यवस्थेत त्रुटी असते. कधी कधी माळी, चौकीदर जागेवर नसतात. त्याचप्रमाणे मनोरंजन मैदानांचीही दुरवस्था पाहायला मिळते. तर मोकळ्या जागांवर अतिक्रमण झालेले आढळून येते. रस्ते दुभाजक तुटलेले असतात. वाहतूक बेटांचीही दूरवस्था झालेली पाहायला मिळते. संबंधित कंत्राटदार नीटपणे लक्ष देत नाहीत, असे आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात येतात.

असे असले तरी पालिका प्रशासन आपली उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळ्या जागा, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे यांच्याबाबत सतर्क नसल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here