@maharashtracity

मुंबई: दादर टी.टी. खोदाद सर्कल येथे बुधवारी बेस्टच्या “तेजस्वीनी” या बसने डंपरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमी बस चालक राजेंद्र सुदाम काळे (५२) यांचा उपचारादरम्यान सायन रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

या अपघातात बस चालक, वाहक यांसह प्रवासी असे एकूण १० जण जखमी झाले होते.
यामध्ये, बस चालक, वाहक व प्रवासी असे ५ जण गंभीर जखमी झाले होते. सध्या बस वाहक व दोन प्रवासी असे ३ जण गंभीर जखमी अवस्थेत सायन रुग्णालयात उपचार घेत आहेत.

बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मरोळ बस आगारातून निघालेली ‘तेजस्विनी’ बस दादर टी.टी. खोदादसर्कल या ठिकाणी आली असता या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि समोरील डंपरवर ही बस जोरात धडकून भीषण अपघात घडला होता.

Also Read: वाहक – चालकांच्या आत्महत्येमागे एस टी बँकेची सक्तीची कर्ज वसुली कारणीभूत?

या अपघातात बसचालक, वाहक, प्रवासी असे एकूण १० जण जखमी झाले होते. त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर होती. या सर्व जखमींना तात्काळ पालिकेच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये जास्त गंभीर जखमी बस चालक राजेंद्र सुदाम काळे (५२) यांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.

या अपघातात वाहक काशीराम धुरी (५७), सुलतान अन्सारी (५०), रुपाली गायकवाड (३६ ) हे तिघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तसेच, उपचाराने बरे वाटल्याने, ताहीर हुसेन (५२) मन्सूर अली (५२), श्रावणी म्हस्के (१६) व वैदेही बामणे (१७) यांना घरी पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here